मित्रांनो आजच्या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला Pustakache Atmavrutta Nibandh (पुस्तकाचे आत्मवृत्त निबंध) या विषयावर माहिती देणार आहे. तसेच मी तुम्हाला आला पुस्तकांचे मनोगत सांगणार आहे. तर मित्रांनो सुरु करूया आजचा आर्टिकल म्हणजेच, Pustakache Atmavrutta Nibandh – पुस्तकाचे आत्मवृत्त निबंध.
Pustakache Atmavrutta Nibandh 200 words
नमस्कार मी पुस्तक बोलतोय लहानांपासून मोठ्यांपर्यंत मी सर्वांचा मित्र. कोणतीही माहिती लोकांना लिखित स्वरूपात हवी असेल तर लोक मलाच प्राधान्य देतात. माझ्यामुळेच लोकांना माहिती मिळते. मी कधी गोष्टी स्वरूपात असतो तर कधी कवितांच्या स्वरूपात कधी विज्ञान-तंत्रज्ञानातील माहिती अशा विविध प्रकारच्या माहिती संग्रहांचे स्वरूपात मी असतो.
माझी जन्मकहाणी खूपच मजेदार आहे. माझा जन्म हा लेखक लेखिका कवी कवयित्री यांच्यामुळे झाला त्यांनी पूर्वी मला लिहिण्यासाठी खूप कष्ट घेतले पण सुरुवातीच्या काळात माझे वास्तव्य साध्या कागदांवर नियमित होते. कालांतराने माझे पुस्तकात रूपांतर झाले.
ते कागदांवर चे लेख छपाईसाठी छापखान्यात नेहले तिथे गेल्यानंतर अनेक प्रक्रिया नंतर माझे एका सुंदर पुस्तकात रूपांतर झाले. अशी अनेक पुस्तके छापली गेली आणि नंतर माझा खरा प्रवास सुरू झाला.
पुस्तकात रूपांतर झाल्यानंतर माझे स्थलांतर पुस्तक विक्रेत्यांच्या दुकानात शाळा-कॉलेजच्या ग्रंथालयात घरांमध्ये झाले तिथे राहिल्यानंतर माझी अनेक पुस्तकांची ओळख झाली तिथे माझे अनेक मित्र झाले.
एके दिवशी वाचनाची आवड असलेल्या एका शाळेतील विद्यार्थ्यांनी मला एका पुस्तक विक्रेत्याचे दुकानातून विकत घेतली. तेव्हा मी खूप खुश झालो तो मुलगा मला घरी घेऊन गेला आणि मला सुंदर खाकी पोशाख चढवून त्याने सुंदर अक्षरात माझ्या पहिल्या पानावर त्याचे नाव लिहिले.
दुसऱ्या दिवसापासून त्यांनी मला वाचायला सुरु केली त्याच्या वाचनाची एकाग्रता आणि माझ्यावरचे प्रेम बघून मी खूप खुश झालो. तो काळजीपूर्वक एक एक पलटून वाचत होता. त्याच्या एकाग्र त्यामुळे त्याला वाचनाची किती आवड आहे हे मला समजले.
त्याला माझ्याकडून खूप माहिती मिळाली हे मला त्याच्या चेहऱ्यावरून समजले होते त्यामुळे मीसुद्धा समाधानी होतो. एक सुंदर अनुभव मी माझ्या आयुष्यात संपवला पण अनेक वाईट अनुभव सुद्धा मी अनुभवले आहेत. काही लोक मला खरेदी करतात पण माझी काळजी घेत नाही वाचताना माझी पाणी वेडीवाकडी मोडतात.
विशिष्ट पान अधोरेखीत करण्यासाठी माझ्या पानांवर पेनाने कसेही रेखाटतात त्यामुळे माझी स्वच्छ पांढरे शुभ्र पाणी घाण करून घराच्या कोपऱ्यात टाकतात. मी पडलेलो असतो असे वाईट अनुभव सुद्धा मी घेत असतो. लेखकांची माझे एक अतूट नाते आहे.
मला लिहिण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट मी जवळून बघतो त्यामुळे माझे त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि तेही माझ्यावर खूप प्रेम करतात. लेखकांनी मला घडवली आहे म्हणून मी त्यांचा खूप आभारी आहे.
शेवटी माझी एकच विनंती आहे की आम्ही तुम्हाला भूतकाळात नेहतो वर्तमान काळातील तंत्रज्ञानाची माहिती तुमच्या पर्यंत पोचतो आम्ही तुमचा एक गुरु आहे. आमची काळजी घ्या आणि हा ज्ञानाचा वारसा पुढे चालवला मदत कर.
पुस्तकाचे आत्मवृत्त निबंध मराठी 2023
आज मी माझ्या जीवनाचे शेवटचे क्षण मोजत आहे. परंतु मी सुरुवातीला असा नव्हतो. लेखकाने माझ्यावर रचना केली, चित्रकाराने माझ्यासाठी चित्र काढले. मी नेहमी दुसऱ्यांसाठी जगलो. आज माझ्याकडे भरपूर वेळ आहे म्हणून मी आत्ता तुम्हाला माझी आत्मकथा सांगतो.
“बोलतात मला पुस्तक सगळे, बघा माझी दशा,
माझे चांगले दिवस गेले आता, ऐका माझी आत्मकथा.”
मुलांनो मी पुस्तक बोलतोय “पुस्तक हेच खरे मित्र” आहे. हे असे विचारवंताने म्हटले आहे. मुलांनो लहानपणापासून मोठ्यापर्यंत मी तुमचा मित्र आहे.
विविध प्रकाराचे ज्ञान माझ्याकडे आहे. त्याचा उपयोग तुम्ही आपल्या ज्ञानासाठी, मनोरंजनासाठी, प्रगतीसाठी करतात. मला त्याच्यामुळे खूप आनंद आणि समाधान मिळतो.
माझा जन्म लेखक लेखिका कवी कवयत्री यांच्यामुळे झाला. विविध विषयांवर लेखन करून पुस्तक रूपाने मी तुमच्या पर्यंत पोचतो. मी कधी दुकानात कधी कपाटात कधी वाचनालयात असा सर्वत्र असतो. मुलांनो मी काही वाईट अनुभव सुद्धा अनुभवले आहेत.
काही लोक मला विकत घेतात पण माझी काळजी घेत नाही. मला कुठेही टाकून देतात व माझे पान फाडून इकडं तिकडं फेकून देतात व त्याचा खेळण्यासाठी वापर करतात.
घराच्या कोपऱ्यात मी पडलेलो असतो असे अनेक वाईट अनुभव मी घेतले आहे. तसेच काही लोक माझ्यावर पेनाने वाकडे तिकडे रेषा मारतात याचं मला फार वाईट वाटते कारण माझे पांढरे शुभ्र कागद हे खराब होतात.
मुलांनो अजून एका गोष्टीची आम्हाला खंत वाटते. आजचे जग हे झपाट्याने बदलत आहे. संगणक युग आले आहे. या युगात गुगलने आमचे स्वरूप तंत्रज्ञानाशी जोडले आहे. आम्ही कागद रुपी पुस्तके ई-बुकच्या माध्यमातून, ऑडिओ व्हिडीओ स्वरुपात मोबाईल मध्ये असतो.
मग आमच्यासारखी कागदी पुस्तके एक तर भंगारमध्ये जातात किंवा एका कोपऱ्यात फाटलेल्या जीर्ण अवस्थेत पडून असतात. मुलांना जाता जाता तुमच्याकडे एकच अपेक्षा आहे की आमची काळजी घ्या. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ज्ञानाचा हा वारसा पुढे घेऊन जाण्यास मदत करा.
आज काय शिकलो:
मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला Pustakache Atmavrutta Nibandh (पुस्तकाचे आत्मवृत्त निबंध मराठी) याच्या बद्दल माहिती दिली आहे. तसेच मी तुम्हाला पुस्तकांचे मनोगत या विषयावर सुद्धा माहिती दिली आहे. तर मित्रांनो आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटू पुढच्या आर्टिकल मध्ये एका नवीन विषयावर नविन माहिती सोबत.