Diabetes information in Marathi | मधुमेह माहिती मराठीमध्ये

नमस्कार मित्रांनो आजच्या या आरोग्यविषयक पोस्ट मध्ये आपण Diabetes information in marathi | मधुमेह माहिती मराठी मध्ये या विषयी माहिती घेणार आहोत. आजच्या या पोस्ट मध्ये मी तुम्हाला मधुमेह (Diabetes) काय आहे. मधुमेह (Diabetes) का होतो. मधुमेहाची (Diabetes) लक्षणे काय आहेत. तसेच मधुमेहाचे (Diabetes) प्रकार किती व कोणते आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. चला तर आजच्या आपल्या आर्टिकलची सुरुवात करूया.

Diabetes-information-in-Marathi
Diabetes information in Marathi/Symptoms of Diabetes in Marathi

मधुमेह काय आहे? | Diabetes information in marathi ?

मधुमेह (Diabetes) हा एक असा आजार आहे जो तुमच्या रक्तातील ग्लुकोज, ज्यालाच रक्तातील साखर देखील म्हटले जाते, जेव्हा गुल्कोज खूप जास्त वाढते तेव्हा मधुमेह (Diabetes) होतो. मधुमेह (Diabetes) यालाच शुगर असेही म्हटले जाते. रक्तातील ग्लुकोज हा तुमचा उर्जेचा (त्यालाच आपण energy असेही म्हणतो) याचा मुख्य स्त्रोत आहे आणि तुम्ही खात असलेल्या अन्नातून ग्लुकोज तयार केला जातो. इन्सुलिन, हा एक स्वादुपिंडाने तयार केलेला हार्मोन आहे, हा हार्मोन अन्नात असलेले ग्लुकोज आपल्या शरीरच्या पेशींमध्ये ऊर्जेसाठी वापरण्यात यावे यासाठी मदत करतो.

काही वेळा असे होते कि तुमचे शरीर पुरेसे किंवा कुठल्याही प्रकारचे इन्सुलिन तयार करत नाही किंवा तयार इन्सुलिनचा चांगला वापर करत नाही. असे झाल्यामुळे ग्लुकोज तुमच्या रक्तात राहते आणि तुमच्या शरीराच्या पेशींपर्यंत पोहोचत नाही. यामुळे कालांतराने, तुमच्या रक्तात जास्त प्रमाणात ग्लुकोज असल्याने समस्या निर्माण होऊ शकतात. मधुमेहावर कोणताही इलाज नसला तरी जो पूर्णपणे मधुमेह बरा करू शकतो, तुम्ही तुमचा मधुमेह नियंत्रित करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी पावले उचलू शकता. तो नियंत्रित राहवा त्यासाठी पर्यन्त करू शकता.

हे देखील जाणून घ्या:

बदाम खाण्याचे फायदे | Badam Khanyache Fayade in Marathi

मधुमेहाचे प्रकार | types of diabetes :

मित्रांनो मधुमेहाचे तीन प्रकार पडतात ते खालील प्रमाणे:
टाइप 1 मधुमेह – Type 1 diabetes
टाइप 2 मधुमेह – Type 2 diabetes
गर्भधारणा मधुमेह – Gestational diabetes

खाली या सर्व प्रकाराबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे.

टाइप 1 मधुमेह – Type 1 diabetes in Marathi:

जर तुम्हाला या प्रकारातील टाइप 1 मधुमेह असेल तर, तुमचे शरीर पूर्णपणे इन्सुलिन बनवण्यास असमर्थ ठरते. तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा तुमच्या स्वादुपिंडातील पेशींवर हल्ला करते आणि त्यांचा नाश करते. स्वादुपिंडातील पेशी शरीरात इन्सुलिन बनवतात. शारीर इन्सुलिन तयार न करू शकल्यामुळे टाइप 1 मधुमेह असलेल्या लोकांना जिवंत राहण्यासाठी दररोज इन्सुलिन घेणे आवश्यक आहे. हे रुग्ण कधीच diabetes पासून बरे होऊ शकत नाही.

टाइप 2 मधुमेह – Type 2 diabetes in Marathi :

जर तुम्हाला टाइप 2 मधुमेह असेल, तर तुमचे शरीर इंसुलिन चांगले बनवत नाही किंवा त्याचा वापर करत नाही. टाईप 2 मधुमेह कोणत्याही वयात, अगदी बालपणातही होऊ शकतो. या प्रकारचा मधुमेह बहुतेकदा मध्यमवयीन आणि वृद्ध लोकांमध्ये आढळतो. टाइप 2 हा मधुमेहाचा सर्वात सामान्य प्रकार असल्यामुळे तुम्हाला सर्वात जास्त रुग्ण या प्रकाचेच आढळतील.

गर्भधारणा मधुमेह – Gestational diabetes :

काही स्त्रिया गरोदर असताना गर्भधारणेचा मधुमेह विकसित होतो. बहुतेक वेळा, गर्भधारणा मधुमेह – Gestational diabetes बाळाच्या जन्मानंतर निघून जातो. जर तुम्हाला गर्भावस्थेचा मधुमेह झाला असेल, तर तुम्हाला नंतरच्या आयुष्यात टाईप 2 मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. काहीवेळा गर्भधारणेदरम्यान निदान झालेला मधुमेह हा प्रत्यक्षात टाइप २ मधुमेह असतो. इन्सुलिन देऊन हा प्रकार नियंत्रित केला जातो.

हे देखील जाणून घ्या:

Kaju Benefits in marathi | काजू खाण्याचे फायदे

मधुमेह का होतो | Why does diabetes occur in Marathi? :

जेव्हा स्वादुपिंड, पोटामागील ग्रंथी, पुरेशा प्रमाणात इन्सुलिन हार्मोन तयार करत नाही किंवा शरीर इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाही तेव्हा मधुमेह होतो. इन्सुलिन रक्तप्रवाहातून साखर पेशींमध्ये नेण्यास मदत करते. पेशींच्या आत गेल्यावर साखरेचे त्वरित वापरासाठी ऊर्जेत रूपांतर होते किंवा भविष्यासाठी साठवले जाते. ती ऊर्जा आपल्या अनेक शारीरिक कार्यांना चालना देते. टाइप 1 मधुमेह – Type 1 diabetes होण्यामागे मुख्यतः तुमची अनुवांशिकता असते जर तुमच्या घरामध्ये आधीपासून मधुमेह आहे तर खूप अधिक शक्यता आहे कि तुम्हाला देखील मधुमेह असेल.

टाइप 2 मधुमेह – Type 2 diabetes Symptoms in Marathi :

  • वजन वाढणे किव्हा लठ्ठपणा
  • अनुवांशिकता
  • बैठी जीवनशैली असल्यामुळे.
  • वाढते वय
  • पॉलीसिस्टिक अंडाशय सिंड्रोम
  • उच्च रक्तदाब – High blood pressure
  • असामान्य कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईड पातळी – Abnormal cholesterol and triglyceride levels

मधुमेहाची लक्षणे काय आहेत? | Symptoms of Diabetes in Marathi? :

मधुमेह आहे हे जाणून गेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे डॉक्टरांकडून त्याची तपासणी करून घेणे. खाली दिलेली लक्षणे आपल्याला सावध होण्यास मदत नक्कीच करू शकतात. कुठल्याही निर्यावर पोहोचण्याआधी जर आपणास खालील प्रकारची लक्षणे दिसत असतील तर आधी डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या जर मधुमेह आढळ्यास त्यावरील उपचार सुरु करा.

Symptoms of Diabetes in Marathi | मधुमेहाची लक्षणे:

  • वारंवार लघवी लागणे पुष्कळदा रात्रीच्या वेळी लागणे – Urinate (pee) a lot, often at night
  • खूप तहानलेले असणे
  • प्रयत्न न करता वजन कमी होणे
  • खूप भूक लागणे
  • अंधुक दृष्टी असणे
  • हात किंवा पाय सुन्न पडणे किंवा मुंग्या येणे
  • खूप थकवा जाणवतो
  • त्वचा खूप कोरडी पडणे
  • जखम बरी होण्यास जास्त वेळ लागणे

Conclusion:

आजच्या या Diabetes information in Marathi (मधुमेह माहिती मराठीमध्ये) या आर्टिकल मधे तुम्हाला मी मधुमेह विषयी माहिती दिली आहे. त्यामध्ये तुम्हाला मधुमेहाचे प्रकार (types of diabetes) आणि Type 2 diabetes Symptoms in Marathi तसेच Symptoms of Diabetes in Marathi देखील सांगितले आहे. अशा आहे कि तुम्हाला वरील सर्व माहिती समजली असेल व ती तुम्ही अमलात नक्की आणाल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top