100+ Happy Diwali Wishes in Marathi, Quotes 2021 | दिवाळी सणांची माहिती

Happy Diwali Wishes in Marathi 2021: मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला Happy Diwali Wishes in Marathi आणि दिवाळी सणाची माहिती देणार आहे. तसेच मी तुम्हाला दिवाळी हा सण का साजरा केला जातो व दिवाळीच्या पाच दिवसांचे महत्त्व पण सांगणार आहे. तर मित्रांनो सुरू करूया आजचा आर्टिकल म्हणजेच Happy Diwali Wishes in Marathi आणि दिवाळी सणाची माहिती.

Happy Diwali Wishes in Marathi Quotes 2021

धनाची पूजा, यशाचा प्रकाश,
कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन,
संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा,
प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या
आपल्या सहकुटुंब, सह परिवारास सोनेरी शुभेच्छा..
शुभ दिवाळी!

शुभ दीपावली
दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,
साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,
मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या
परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!

शुभ दिवाळी
दिवाळी निमित्त शुभेच्छा
घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी,
माळोनी गंध मधुर उटण्याचा..
करा संकल्प सुंदर जगण्याचा,
गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा..
दीपावली शुभेच्छा!
दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा !

हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे,
प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच
मनोकामना…!

Happy Diwali WhatsApp Wishes in Marathi

जीवनाचे रूप आपल्या
तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी,
खरोखरच अलौकिक असुन,
ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान,
आणि वैभवाच्या दीपमाळांनी,
जीवन लखलखीत करणारी असावी…
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

शुभ दिपावली
नक्षत्रांची करीत उधळण, दीपावली ही आली..
नवस्वप्नांची करीत पखरण, दीपावली ही आली..
सदिच्छांचे पुष्पे घेउनी, दीपावली ही आली..
शुभेच्छांचे गुच्छ घेउनी, दीपावली ही आली..
दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा!

शुभ दिपावली
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
आली दिवाळी उजळला देव्हारा..
अंधारात या पणत्यांचा पहारा..
प्रेमाचा संदेश मनात रुजावा..
आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Diwali HD Images in Marathi 2021

happy-diwali-wishes-marathi
happy-diwali-wishes-marathi
diwali quotes marathi 2021
diwali quotes marathi 2021
happy diwali hd images marathi
happy diwali hd images marathi
happy diwali sms marathi
happy diwali sms marathi

Happy Diwali Messages in Marathi 2021

दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा
गणेशपूजा, लक्ष्मीपूजा,
सरस्वतीपूजा व दीपपूजा,
दिवाळीला उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षोल्हासला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला..
दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा..!

दिवाळी अशी खास,
तिच्यात लक्ष्मीचा निवास…
फराळाचा सुगंधी वास,
दिव्यांची आरास…
मनाचा वाढवी उल्हास,
अशा दिवाळीच्या शुभेच्छा…
तुमच्यासाठी खास !!
हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो…

Dhantrayodashi Wishes in Marathi

आज धनत्रयोदशी!
धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत!
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो!
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो!

ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास,
आनंदाची आणि भरभराटीची जाओ..!

तर मित्रानो आपण आज आता बघितले कि Happy Diwali Wishes in Marathi 2021, Happy Diwali WhatsApp Wishes in Marathi 2021, Dhantrayodashi Wishes in Marathi, Happy Diwali Wishes in Marathi Quotes 2021 या सर्व आज आपण इतक्यात बघितले चला तर मग बगूया Happy Diwali HD Images in Marathi 2021, Happy Diwali Wishes HD Images in Marathi 2021.

दिवाळी सणांची माहिती

भारतामध्ये अनेक उत्सव साजरे केले जातात त्यापैकीच दीपावली म्हणजेच दिवाळी हा हिंदुंचा प्रमुख सणा पैकी एक उत्सव आहे. हे दिवाळी हा सण अश्विन महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात असतो.  दीपावली हा सण साधारण पणे ऑक्टोंबर किंवा नोव्हेंबर या दरम्यान येतो. 

दिपावली या सणाच्या दिवशी आपल्याला सर्व  घरामध्ये लहान समय वातावरण असते सगळी कडे  प्रकाश पाहायला मिळतो. सुंदर अशा रांगोळ्या अंगणात पाहायला मिळतात.  म्हणूनच आपण या सणाला दिवाळी म्हणजे दीपावली असे म्हणतो.

सणाची तयारी सणाच्या अनेक दिवस आधी सुरू होते. त्याची सुरुवात घरे आणि दुकाने पूर्णपणे साफ करण्यापासून होते. बरेच लोक घरातील सर्व जुन्या वस्तू टाकून देतात आणि सण सुरू होण्यापूर्वी सर्व नूतनीकरणाचे काम पूर्ण करतात. 

ही एक जुनी श्रद्धा आहे की देवी लक्ष्मी दिवाळीच्या रात्री लोकांच्या घरी जाऊन त्यांना आशीर्वाद देतात. म्हणून, सर्व भक्त सणांसाठी परी दिवे, फुले, रांगोळी, मेणबत्त्या, दिया, हार इत्यादींनी त्यांची घरे स्वच्छ आणि सजवतात.

दिवाळीच्या वेळी आपल्या घरामध्ये वेगवेगळे पदार्थ बनवले जातात . चकली, चिवडा, लाडू, बुंदी, शेव, करंजा अशा अनेक प्रकारचे पदार्थ आपल्या घरी बनवले जातात व  शेजारच्यांना  व नातेवाईकांना वाटले जातात.

सण हे कुटुंब आणि मित्र यांच्यातील संबंध घट्ट करण्यासाठी केले गेले आहेत आणि दिवाळी हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. प्रत्येकजण दिवाळीसाठी घरी जातो आणि तो आपल्या कुटुंबासह साजरा करतो. 

ही एक राष्ट्रीय सुट्टी आहे, म्हणून प्रत्येकजण कामाची चिंता न करता सणाचा आनंद घेतो. रात्रीच्या वेळी ते अधिक रोमांचक होते कारण बरेच आकाश-कंदील हवेत सोडले जातात जे उडतात आणि रात्रीचे आकाश उजळवतात. आयुष्यात चांगल्या गोष्टींसाठी धीर धरायला दिवाळी शिकवते.

दीपावली सण साजरा करण्यामागची कहानी

मित्रांनो दीपावली उत्सव म्हणजेच दिवाळी उत्सव/ सण  साजरा करण्यामागे एक सुंदर अशी कहाणी आहे. त्याचे एक  वेगळेच महत्व आहे. तर मित्रांनो आता मी तुम्हाला आला दिपावली म्हणजेच दिवाळी का साजरी केली जाते हे सांगणार आहे.

दीपावली या उत्सवाची सुरुवात ही फार प्राचीन काळापासून झाली आहे. दीपावली /दिवाळी  हा सण सुमारे तीन हजार वर्ष जुना आहे. परंतु काही लोकांची अशी श्रद्धा आहे की श्री प्रभू रामचंद्र हे सीतेसह 14 वर्षाचा वनवास  संपवून आयोध्याला त्या दिवशी परतले  होते.  

त्या दिवशी आयोध्या वासियांनी दिवे लावून त्यांचे धुम धडाक्यात स्वागत केले. म्हणून या दिवसापासून दीपावली म्हणजेच दिवाळी हा सण साजरा केला जातो. अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप म्हणजे दिवा मांगल्याचे प्रतिक म्हणून मानला जातो . 

मांगल्याचे प्रतीक असलेल्या दीपकाच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधार दूर व्हावा म्हणून दीपोत्सव साजरा केला जातो.  शेतकरी बांधव हा सण मोठ्या उत्सवाने व आनंदाने साजरा करतात.

मित्रांनो आता मी तुम्हाला दीपावली किती दिवसाचा सण असतो आणि प्रत्येक दिवसाचे काय महत्त्व आहे हे त्याची माहिती देणार आहे.  तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की दिवाळी हा  पाच दिवसांचा सण आहे.  

धनतेरस हा दिवाळीचा पहिला दिवस असतो.  धन म्हणजे पैसा म्हणजेच या दिवशी धनाची पूजा केली जाते.  दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्थी.  या दिवशी घरातील सर्व मुले व मोठे सर्वजण सकाळी लवकर उठतात व सुगंधी उटण्याने आंघोळ करतात.  

घरात आनंदाचं वातावरण असतो.  दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस.  या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते व त्यासोबत घरातील दागिन्यांची पैशांची पूजा देखील केली जाते.  

लहानपासून मोठ्यापर्यंत सर्वजण अनेक प्रकारांचे फटाकडे वाजवतात व हा उत्सव साजरा करतात . तसेच सर्व जण नवीन नवीन कपडे घालतात आणि या दिवशी एक वेगळाच आनंद बघायला मिळतो.  

मुली घराबाहेर मोठमोठ्या रांगोळ्या काढतात व घराच्या अवतीभवती दिवे लावले जातात अशाप्रकारे खूप मोठ्या प्रमाणात हा सण साजरा केला जातो. दीपावलीचा चौथ्या दिवशी दिवाळी पाडवा असतो. दिवाळी पाडवा ला बालप्रतिपदा असेही म्हटले जातात.   

या दिवशी गरीब व श्रीमंत लोक नवीन वस्तू घेतात जसे की मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक डिवाइस, गाड्या अशा अनेक प्रकारांच्या वस्तू घेतले जातात.  

दीपावलीचा शेवटचा दिवस हा भाऊबीज चा दिवस असतो त्यादिवशी बहिण भावाला ओवाळते. भाऊबीज हा सण बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून  मानले जातात म्हणून मानले जातात.

सण हे आपल्या शेजाऱ्यांना जाणून घेण्याचा आणि त्यांच्यासोबत साजरा करण्याचा उत्तम मार्ग आहे. 

/K

दिवाळी आपल्याला प्रत्येकाशी दयाळूपणे वागण्यास शिकवते आणि चांगल्या परिणामांची वाट पाहण्याची धीर धैर्य आणि मनाची असते. आपल्या श्रद्धा आपल्या मनाला आकार देतात; म्हणून, आपण सणांवरील विश्वास कधीही गमावू नये.

दिवाळी फार पूर्वीपासून फटाके फोडण्याशी संबंधित आहे पण, ते आवश्यक आहे का?

नक्कीच नाही! आपण सर्वजण घरीच राहिलो आणि आपल्या मित्रांसह आणि कुटुंबासह हार्दिक जेवणाचा आनंद घेतला तर दिवाळी अजूनही आश्चर्यकारकपणे साजरी केली जाऊ शकते. फटाके फोडल्याने वातावरणात हानिकारक वायू बाहेर पडतात ज्यामुळे शेवटी वायू प्रदूषण होते.

फटाक्यांनी आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या प्राण्यांना त्रास होतो. इतरांच्या सुरक्षिततेशी तडजोड न करता आपण जबाबदारीने सण साजरा केला पाहिजे. 

दिवाळीच्या दरम्यान, घरांमध्ये ताज्या शिजवलेल्या अन्नातून उगवलेल्या मधुर सुगंधाच्या जाड सुगंधाने भरलेले असते. सणासुदीच्या वेळी उत्कृष्ट पदार्थ शिजवले जातात आणि खाल्ले जातात. 

आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की सण आपल्यामध्ये बंधुत्वाची महत्वाची भावना जोपासण्यासाठी बनवले गेले आहेत आणि उत्सवाच्या नावाखाली आपला परिसर नष्ट करू नये.

दीपावली ची सुरुवात कशी झाली?

दीपावली या उत्सवाची सुरुवात ही फार प्राचीन काळापासून झाली आहे. दीपावली /दिवाळी  हा सण सुमारे तीन हजार  वर्ष जुना आहे. परंतु काही लोकांची अशी श्रद्धा आहे की श्री प्रभू रामचंद्र हे सीतेसह 14 वर्षाचा वनवास  संपवून आयोध्या ला त्या दिवशी  परतले  होते.  त्या दिवशी आयोध्या वासियांनी दिवे लावून त्यांचे धुम धडाक्यात स्वागत केले.  म्हणून या दिवसापासून दीपावली म्हणजेच दिवाळी हा सण साजरा केला जातो.

FAQ

दिवाळी किती दिवसांचा सण आहे?

दिवाळी हा पाच दिवसांचा सण आहे.

दीपावली ची सुरुवात कशी झाली?

लोकांची अशी श्रद्धा आहे की श्री प्रभू रामचंद्र हे सीतेसह 14 वर्षाचा वनवास  संपवून आयोध्या ला त्या दिवशी परतले  होते.

आज काय शिकलो:

मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला दिवाळीविषयी माहिती दिली आहे.  तसेच मी तुम्हाला दिवाळी सणाचे महत्व सांगितले आहे आणि दिवाळी का साजरी केली जाते हे पण मी तुम्हाला सांगितलं आहे. 

तसेच दिवाळी कशा प्रकारे साजरी करतात आणि दिवाळी किती दिवस साजरी केली जाते व  त्याच्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व हे पण मी तुम्हाला आजचा आर्टिकल मध्ये सांगितले आहे.  तर मित्रांनो आज आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटू एका नवीन आर्टिकल मध्ये नवीन माहिती सोबत.

Topics Covered:

  • Happy Diwali Wishes in Marathi 2021,
  • Happy Diwali WhatsApp Wishes in Marathi 2021,
  • Dhantrayodashi Wishes in Marathi,
  • Happy Diwali Wishes in Marathi Quotes 2021
  • Happy Diwali HD Images in Marathi 2021,
  • Happy Diwali Wishes HD Images in Marathi 2021.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top